ऑनलाईल शॉपिंग अॅपला मराठीचा पर्याय असावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतडून करण्यात आली होती. या मागणीच्या विरोधात आता ॲमेझॉन कोर्टात गेलंय.
दरम्यान यासंदर्भात आता ॲमेझॉनच्या विरोधामध्ये एक नवी मोहीम सुरू केलीये. मनसेच्या मागणीनंतर अजूनही अमेझॉनने मराठीचा पर्याय दिला नाहीये. यासाठी आता ‘नो मराठी… नो ॲमेझॉन, बॅन अमेझॉन, महाराष्ट्रात फक्त मराठी, इथून पुढे तुमची डिलिव्हरी तुमची जबाबदारी…’ असं म्हणत मनसेने विरोध केलाय.
जवळपास १५ कोटी मराठी नागरिक ॲमेझॉन ॲपद्वारे खरेदी करतात. मग असं असताना ॲमेझॉन या मागणीकडे दुर्लक्ष का करतंय असा सवाल मनसेने उपस्थित केलाय.
0 Comments