पॅन हे आधार शी जोडणं बंधनकारक, नाहीतर भरावा लागेल १०,००० हजार भुर्दंड

 
पॅन कार्ड सगळ्या आर्थिक आणि बँकेशी निगडिक व्यवयायामध्ये पॅनकार्ड महत्त्वाचं असतं. मग ते एखाद्या बँकेत खातं उघडण्याचं काम असो किंवा व्यवसाय सुरू करण्यापर्यंत पॅनकार्ड सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र आहे.

 PAN नंबरद्वारे केलेले आर्थिक व्यवहार वैध मानले जातात. अनेक यामुळे मोठी फसवणूकही टाळता येते. पॅनकार्डच्या वापरामुळे भविष्यात कायदेशीर अडचणीत येण्याची शक्यता कमी असते. पण या सगळ्यात पॅनकार्ड  आधार कार्डशी  जोडलेलं असणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
(Advertise)

केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेनुसार पॅनकार्ड आधारशी जोडणं  बंधनकारक असणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या कामासाठी ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. जर शेवटच्या तारखेपर्यंत कार्ड लिंक झालं नाही तर तुम्हाला १०,००० रुपये दंड आकारला जाऊ शकतो. यामुळे तुम्हीही जर पॅनकार्ड आधारशी लिंक केलं नसेल तर तातडीने ती प्रक्रिया पूर्ण करा.

Post a Comment

0 Comments