झारखंड सरकारने सरकारी नोकरीसाठी एक अनोखी अट :
राज्य सरकारने म्हटलं आहे की सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या सर्वांना तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करता येणार नाही किंवा भविष्यात ते या पदार्थांचं सेवन करणार नाहीत, असं प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल. पुढील वर्षी १ एप्रिलपासून झारखंडमध्ये हा नवीन नियम लागू होणार आहे. हा नियम त्याच उमेदवारांसाठी असेल, जे झारखंड सरकारच्या कोणत्याही विभागात नोकरीसाठी अर्ज करत आहेत.
तंबाखूच्या दुकानात कोणताही खाद्यपदार्थ उपलब्ध होणार नाहीत :
गेल्या मंगळवारी रांची येथे झालेल्या तंबाखू नियंत्रण समितीच्या बैठकीत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये खाद्यपदार्थांची विक्री होणार नाही, असा निर्णय घेण्यात आला.
येथे चहा-बिस्किटांची विक्री होणार नाही, असं एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. या अहवालात झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांचा हवाला देत असं म्हटलं आहे की यामध्ये सर्वांचं एकमत झालं पाहिजे. यामुळे नवीन पिढीला तंबाखूचे सेवन करण्यासारख्या वाईट सवयीपासून वाचवण्यासाठी मदत होईल.
0 Comments