प्रा.डॉ.प्रभाकर माने/शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील दतवाड या गावी एका अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलाकडून लैंगिक अत्याचार करण्यात आले.त्यामुळे गावात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली असून कुरुंदवाड पोलीसाकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी चोख व कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सदर पीडित अल्पवयीन मुलगी ही ६ वर्षाची असून अत्याचार करणारा अल्पवयीन मुलगा हा १४ वर्षाचा आहे.सदर बालिका ही घरासमोर खेळत असताना स्वतःच्या घरात कोणी नसल्याचा अंदाज घेऊन पीडित बालिकेला खेळण्याच्या बहाण्याने घरी नेऊन तिच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला.सदर घटने नंतर मुलगी वारंवार रडत असल्याने तिच्या नातेवाईकांनी कसून माहिती घेतली असता संबंधित मुलगीने घडलेल्या घटनेची माहिती दिली. शारीरिक तपासणी करता रक्तस्त्राव होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन मेडिकल तपासणी केली.
कुरुंदवाड पोलिसांना घटनेची माहिती मिळताच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. पीडित अल्पवयीन मुलगी व मुलगा यांना पुढील प्रक्रियेचा भाग म्हणून मेडिकल तपासणीसाठी कोल्हापूरला पाठविण्यात आले. सदर घटनेची माहिती गावात कळताच तणाव निर्माण झाला. पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेप व सतर्कतेमुळे गावात शांतता निर्माण झाली.
या घटनेच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी गुरुवारी गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले. अशी माहिती कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांनी दिली. दरम्यानच्या काळात जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, महिला पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड व इचलकरंजी उपविभागीय पोलीस उपअधीक्षक बी.बी.महामुनी यांनी पीडित मुलीच्या घरी भेट देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला. गावातील सद्य परिस्थितीची माहिती समजून घेतली. पोलीस खाते या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
0 Comments