'बाई वाड्यावर या' फेम मानसी नाईकचा साखरपुडा; लवकरचं अडकणार मानसी आणि प्रदीप लग्नाबंधनात


अभिनेत्री मानसी नाईकचा साखरपुडा झाला आहे. सोशल मीडियावर बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबतचा फोटो पोस्ट करत मानसीने माहिती दिली आहे. 
 तिने आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. मानसीचा होणारा नवरा प्रदीप खरेरा हा बॉक्सर आहे. या दोघांचा मुंबईत काल साखरपुडा झाला. 

मानसीने या सोहळ्याला लाईट ऑरेंज आणि ग्रीन रंगाची साडी नेसली होती. तर प्रदीपने प्रिंटे़ड शर्ट आणि पजामा कुर्ता असा पोशाख केलेला. दोघंही फोटोंमध्ये अतिशय सुंदर दिसत आहेत. 

साखरपुड्याचा हा कार्यक्रम कोरोनाच्या काळात अतिशय साधेपणाने झाला. फक्त ६ लोकांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. यावेळी मानसीचे कुटुंबिय आणि मानसीची अतिशय जवळची मैत्रिण अभिनेत्री दिपाली सय्यद होती. 
'या महामारीच्या काळात आम्ही आमचा साखरपुडा अतिशय साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला. 
आम्ही महाराष्ट्रीयन पद्धतीने साखरपुडा आणि त्यांच्या पद्धतीने रोका अशा दोन्ही पद्धती यावेळी केल्या,' असं मानसी सांगते. 

आता साखरपुडा करण्याचं कारण आमच्या दोन्ही पालकांना असं वाटत होतं. प्रदीप मुंबईला होता. त्याच्या वडिलांच्या सांगण्यानुसार हा सोहळा पार पडला. आम्ही जानेवारीत लग्नाचा विचार केला आहे. 
वाढदिवसानिमित्त स्वत:लाच मी प्रेमाची भेट देत मानसीने प्रदीपसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. यावेळी तिने पहिल्यांदा आपल्या प्रेमाची कबुली दिली. प्रदीपनेही त्याच्या इन्स्टाग्रामवर मानसीसाठी भावनिक मेसेज लिहिला होता. 

Post a Comment

0 Comments