मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज ( दि. १८ ) राज्य सरकार गाय मंत्रिमंडळाची स्थापना करणार असल्याची घोषणा केली. प्राणी संरक्षण, वन, पंचायत, ग्रामीण विकास, गृह आणि शेतकरी कल्याण हे विभाग या गाय मंत्रिमंडळाचे भाग असणार आहेत.
मुख्यमंत्री चौहान यांनी ट्विट करत 'आम्ही राज्यात गाईचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी गाय मंत्रीमंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.
या गाय मंत्रिमंडळात प्राणी संरक्षण, वन, पंचायत, ग्रामीण विकास, गृह आणि शेतकरी कल्याण हे विभाग समाविष्ट असतील. या मंत्रीमंडळाची पहिली बैठक २२ नोव्हेंबरला अगर मालवा येथील गाईंच्या अभयारण्यात गोपाष्टमाला होणार आहे.' या नव्या गाय मंत्रीमंडळाबाबत माहिती दिली.
0 Comments