सोलापूर/प्रतिनिधी:
कार्यालयातील पक्षभंग सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे मोहिते-पाटील गटातील सहा सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाविरोधात जाऊन मोहिते-पाटील गटातील सहा सदस्यांनी मतदान केले होते. त्यामुळे सहा सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली होती.
पक्षाविरोधात मतदान केलेल्या मोहिते-पाटील गटातील सहा सदस्यांविरोधातील सुनावणी जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर व्हावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. त्यामुळे मोहिते-पाटील गटातील सहा सदस्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित पक्षकारांना पुढील कामकाजासाठी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अचूकता आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातील कारभाराची शहानिशा आता सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.
0 Comments