बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा नवरा निक जॉनस नेहमीच चर्चेत असतात. डिसेंबर २०१८ मध्ये या दोघांनी शाही विवाहसोहळ्यात लग्नगाठ बांधली.
प्रियांका-निकच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण असून प्रियांकाने अनेक मुलाखतींमध्ये निक व त्याच्या कुटुंबीयांविषयी बऱ्याच गोष्टी मनमोकळेपणाने सांगितल्या. गेल्या वर्षी दिलेल्या एका मुलाखतीत प्रियांकाने चक्क बेडरुम सिक्रेट सांगितलं.
ईटी ऑनलाइन’ला दिलेल्या या मुलाखतीत ती म्हणाली होती, “हे खरंच खूप त्रासदायक आहे, पण रोज सकाळी उठल्यावर निक माझा चेहरा सर्वांत आधी पाहण्याचा आग्रह धरतो.
झोपेतून उठल्यावर किमान मला तोंड धुवू दे किंवा एखादा मॉइश्चराइजर तरी लावू दे असं माझं म्हणणं असतं. पण ही तितकीच गोड गोष्ट आहे. आपल्या पतीने सकाळी उठल्यावर सर्वांत आधी आपला चेहरा पाहावा अशी अनेकांची इच्छा असते.”
1 Comments
फालतू बातम्या देऊ नका.. जरा भारतीय संस्कार जपा.
ReplyDelete