" जयसिंगपूरात साई फिटनेस जिम व अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ यांच्यावतीने संविधान गौरव दिन व शहिदांना अभिवादन"

प्रा.डॉ.प्रभाकर माने/शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी

 संपूर्ण देशात आज २६ नोव्हेंबर भारतीय संविधान गौरव दिन व २६/११ मध्ये  शहीद झालेल्या जवानांना  व बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली व अभिवादन देशभर सुरू असताना त्याचाच आदर्श भाग म्हणून जयसिंगपूर शहरातील साई फिटनेस जिम व अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ,संभाजीनगर यांनी २६ नोव्हेंबर संविधान गौरव दिन म्हणून साजरा करण्या बरोबर शहिदांना मेणबत्त्या पेटवून व भारत माता की जय  घोषणेसह त्यांच्या कार्याला व  स्मृतीला उजाळा दिला. यावेळेस विनायक गायकवाड यांनी 'व्यर्थ न हो बलिदान, या विचाराने स्वतः प्रेरित होऊन आपले देशभक्तीपर मनोगत व्यक्त करून सच्चा देशभक्त व जातीवंत नागरिक होण्याचे भावनिक आवाहन केले. 
         (Advertise)

त्याचबरोबर चंदू भंडारे यांनी संविधानामुळे या देशातील प्रत्येक घटक एकसंघ बांधला गेल्यामुळे जगातील मानवतावादी विचार या देशात प्रकर्षाने दिसतो. मानवी व सामाजिक मूल्य विषयक बोलण्याचे धाडस या संविधानामुळे या संविधानामुळे प्राप्त झालेआहे.त्यामुळे संविधानाला व संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना सलाम होय अशा प्रकारचे गौरव करणारे विचार व्यक्त केले. याप्रसंगी 'भारतीय राज्यघटनेच्या सरनामाचे' सामूहिक वाचन करण्यात आले.
      (Advertise)

या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन साई फिटनेस जिमचे प्रमुख विनायक गायकवाड, नगरसेवक गुंडाप्पा पवार व सामाजिक कार्यकर्ते चंदू भंडारे यांच्या नेतृत्वाखाली  करण्यात आले होते. या अभिवादन कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते सागर माने,अमोल जोशी, सागर वैदू, ओंकार वैदू ,इरफान नदाफ ,अशोक भंडारे, छोटू भंडारे, संदीप शिंदे,प्रविण कोळी,राहुल आवळे, सौरभ तिवडे, सागर खांडेकर,अभि भंडारे,अशोक कलकुटगी, सुरज आवळे,संजय कांबळे,ऋषि कोळी,विकी,बंडू रजपूत,सुनील खांडेकर व संविधान प्रेमी लोक बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments