त्रिपुरारी पौर्णिमा निमीत्त विठ्ठल मंदिर पणत्यांच्या दीपोत्सवात उजळले



पंढरपूर/प्रतिनिधी:

श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमा निमीत्त श्री.विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच संपूर्ण मंदिरात हजारो पणत्या लावून दिपोत्सव साजरा करण्यात आला. विठ्ठल मंदिर पणत्यांच्या दीपोत्सवात उजळून निघाले होते

कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा असेही म्हणतात. विठ्ठल मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंढरीत विविध ठिकाणी दीपोत्सव व तुळशीच्या लग्नाचे आयोजन करण्यात आले आहे.

विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमा निमीत्त संपूर्ण मंदिरात पणत्यांची रोषणाई करण्यात आली होती. देवाचा गाभारा, सोळखांभी मंडप, चौखांबी मंडप, नामदेव पायरी, उत्तर-दक्षिण दक्षिन द्वारात हजारो पणत्यांच्या दीपोत्सव उजळुन निघाला होता. मंदिरामध्ये रांगोळी काढण्यात आली होती. 

२८ नोव्हेंबर पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मुख दर्शनासाठी भाविकांना खुले करण्यात आले आहे. विठ्ठल मंदिर समितीकडून मुखदर्शनाची संख्या दोन हजारावर तीन हजार करण्‍यात करण्यात आली आहे. त्यामुळे पंढरपुरामध्ये भाविकांची गर्दी होताना दिसत आहे.

Post a Comment

0 Comments