दिवाळीच्या पूर्वसंध्येला पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट


नवीन वर्षाच्या सुरुवातीला पंढरपूरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा गाभारा या आकर्षक फुलांच्या सजवटीने खूलून दिसत आहे. हे नयनरम्य दृष्य पाहून भाविकांनीही आनंद व्यक्त केला आहे.
(Advertise)
देशभरात नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहे. राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी असणाऱ्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने नव वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण मंदिर आकर्षक लॅव्हेन्डर फुलांनी(ब्लू डायमंड) सजवले आहे. देवाचा गाभारा, सोळखांभी मंडप, चौ खांबी मंडप या निळसर फुलांनी सजवला आहे. तसेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी श्री विठुरायचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पंढरीत पहाटे पासूनच गर्दी केली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक नेत्यांनी देखील श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते.
(Advertise)
राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा, शेतकऱ्यांना हे नवीन वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो. तसेच शेतकरी कर्जमुक्त व्हावा.अशाप्रकारेचे साकडे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दर्शनासाठी आल्यानंतर श्री विठ्ठलाकडे घातले असल्याचे अनेक भाविकांनी सांगितले.
(Advertise)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १७ मार्चपासून बंद असलेले श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिराचे संत नामदेव पायरीजवळील महाद्वार (पितळी दरवाजा) दिवाळीच्या निमित्ताने उघडण्यात आला आहे. अद्याप श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आलेले नसले तरी महाद्वार उघडले गेल्यामुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
(Advertise)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १७ मार्चपासून दक्षता म्हणून श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. तेव्हापासून संत नामदेव पायरीजवळील मंदिराचे महाद्वार देखील बंद ठेवण्यात आले होते. चंद्रभागा नदीवर स्नान करून भाविक जेव्हा महाद्वार घाटावरून श्री विठ्ठल मंदिराकडे येतात, तेव्हा याच महाद्वाराचे दर्शन भाविकांना होत असते.

Post a Comment

0 Comments